नातं शब्दांशी

Started by yallappa.kokane, January 28, 2019, 08:58:01 AM

Previous topic - Next topic

yallappa.kokane

नातं शब्दांशी


सहज माझे शब्दांशी
जुळलं आहे छान नातं
रंगती गप्पा मुक्त जेव्हा
गाणं तेव्हा तयार होतं

भासत नाही एकटेपण
मिळता दुःखाचा आहेर
एक शब्दच मित्र माझा
सहज व्यथा येते बाहेर

आहे जादू वेगळी त्यात
नाती सारी जपायची
कागदावर सजतो तेव्हा
दिशा दाखवतो जगायची

यल्लप्पा कोकणे
२७ जानेवारी २०१९


९८९२५६७२६४
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर

Atul Kaviraje

     यल्लप्पा कोकणे सर, " नातं शब्दांशी ", या कवितेतून आपण शब्दांना आपला मित्र करून, त्यातून कविता रुपी मैत्री कशी जन्म घेते,  जी कशी कायमची टिकते, जी आपणास जीवनभर जगण्यास स्वप्ने दाखविते, अशा प्रकारचे अलंकार सहजपणे सजविले आहेत. यमकांचा तुम्ही यासाठी सर्वथा पुरेपूर वापर करून, कवितेस बहार आणली आहे.

     माझे शब्द, आणि त्यातून प्रसवलेली माझी कविता, यांचे तुमच्याशी नाते हे जन्मोजन्मीचे, अतूट आहे, हे या कवितेतून प्रकटपणे जाणवत आहे. अत्यंत उत्कट भाव असलेली आपली हि कविता मनास अत्यंत भावली. अश्याच अर्थपूर्ण कविता आपल्या लेखणीतून कागदावर उतरोत, ही सदिच्छा व्यक्त करतो.

     अक्षरांनी मेळ धरून गुंफीत
     प्रकट केले शब्दांस कागदावर
     शब्दांनी पुढे एकत्र येऊन,
     अंती कवितेस केले साकार.

     हीच कविता जीवन माझे
     हीच कविता प्राण माझा
     मी, माझे, विसरून सारा स्वार्थ,
     जगण्यास देते मला अर्थ.

-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-२९.०५.२०२१-शनिवार.