राज सारे

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, February 08, 2019, 12:46:30 PM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक. राज सारे*

नयनांच्या भाषेचे राज सारे भरास होते
जणू रोज समोरी नवं नवी आरास होते

तुझं भेटणं सखे
न मिळणार मृगजळ
प्रीतीचा झुला घेण्या
अंबरही झाले निष्फळ

अंबर चढण्यास गोड मिठीची परास होते
जणू रोज समोरी नवं नवी आरास होते

ठरवलं होतं तू ही
नक्की हृदय चोरशील
नक्षी तुझ्या सुराची
माझ्या ओठी कोरशील

एकरूपानं स्पर्शाची ओळख सुरास होते
जणू रोज समोरी नवं नवी आरास होते

होता नदीचा किनारा
तू नसता सोबतीला
लाट ओसंडली होती
तेव्हा अश्रू आला मदतीला

पूर ओसरला तेव्हा सारं भ्रमनिरास होते
जणू रोज समोरी नवं नवी आरास होते

लख्ख प्रकाशाची
तू होतीस राणी
मी एकटा पडलो
अन वाली नव्हतं कोणी

आग देतांना शेवटी जखम उरास होते
जणू रोज समोरी नवं नवी आरास होते

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर