असलं तुझं प्रेम

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, February 11, 2019, 02:04:23 PM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.असलं तुझं प्रेम*

असलं तुझं प्रेम होतं
थेट काळजात शिरलं
तेच प्रेम गहाण ठेवतांना
तू काळीज चराचर चिरलं

वाटलं नव्हतं कधी
होईल मरणाला गवसणी
प्रेमात गुंतवणारी तू ही
होशील लग्नाआधीच सुवासिनी

गवतांची दिशा बदलली की
पुन्हा मरणाची चाहूल व्हायची
माझा देह लिपला जायचा
श्वासाची मोजणी जवळ यायची

ठोके चुकत जायचे
भोवताली रिंगण होतांना
अडखळत हात फिरायचा
सावली माझी चोरून नेतांना

पाठी घाव झाले तेव्हा
घर तुझे मागे बोलत होते
दार तुझे उघडले नाही
माझं सरण तुला सलत होते

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर