अर्र देवा--

Started by puneumesh, February 12, 2019, 01:39:52 PM

Previous topic - Next topic

puneumesh

अर्र देवा--
अर्र देवा देवा देवा-- सारखा सारखा छळू नको माझ्या जीवाला
कोणी जाब विचारणार नाही का र तुझ्या कामाला
अर्र देवा--

परक पोर मी-- तूच माझा बा ना
तळ तळ दिसत नाही का र तुझ्या डोळ्याला 
कोणी जाब विचारणार नाही का र तुझ्या कामाला
अर्र देवा--

लाख केल्या असेन मी चुका
तुला थांबवलं कोणी होता मला अडवाया
कोणी जाब विचारणार नाही का र तुझ्या कामाला
अर्र देवा--

रानात ओतलं र मी जीव-- अन केला जीवाच रान
मन् फाशीच का टाकतो माझ्या गळ्याला
कोणी जाब विचारणार नाही का र तुझ्या कामाला
अर्र देवा--

झालं गेलं विसरून जाऊ-- आता जवळ कर तुझ्या बाळाला 
पायाशी एकदा-- फक्त एकदा बसूनघे र माझ्या जीवाला
नाही तर मी विचारीन जाब तुझ्या कामाला
अर्र देवा-- मी काय विचारीन जाब तुझ्या कामाला

उमेश कुलकर्णी, पुणे
puneumesh