सांग तु माझी होशील का...???

Started by अखिल खैरे, February 15, 2019, 11:09:43 PM

Previous topic - Next topic

अखिल खैरे

राणीसरकार.....

दिव्यातली वातं, वातीतलं तेल,
अशी तु साथ देशील का...?
सांग तु माझी होशील का..??

दोन पावलं मी, दोन पावलं तु,
पुढे येऊन, समजुतीने तु,
विचारांचा गुंता, सोडवशील का..?
सांग तु माझी, होशील का...??

पावसाच्या, पहिल्या सरीने,
जशी थंड होते, तप्त धरणी,
तुझ्या प्रेमाने, असं तृप्त करशील का..?
सांग तु माझी, होशील का..??

माझ्या दारिद्रयाचा, वादळात,
लाख जबाबदारीच्या, गजरात,
आधार तु माझा, होशील का..?
सांग तु माझी, होशील का..??

मीठ-भाकरीच्या घासात, चुलीच्या त्या धुरात,
काटकसरीचं जीवन हे, तुंटपुंज्या पगारात !
गळणाऱ्या छतात, संसार तु हा निभवशील का.??
अगं सांग तु माझी, होशील का...???

                                 अखिल खैरे
                              ७७६९८७४४००
( कृपया कविता कॉपी पेस्ट करून वायरल करू नये. करायचं असल्यास नावासह करावे. कारण प्रस्तुत कविता प्रकाशनाकरिता दिलेली आहे.)