साजनी

Started by अखिल खैरे, February 15, 2019, 11:31:52 PM

Previous topic - Next topic

अखिल खैरे

साजनी...

साजनी मनं झुरतंय गं,
साजनी मनं छळतंय गं !
तुझ्या प्रितीच्या झुंजीत,
मनं हरलंय गं !!

घात झाला माझा राणी, तुझ्या नैनी बाणाने,
पडलं ह्रदय निपचीत, तुझ्या देहबोलीने !
साजनी मन तळमळते गं,
तुझ्या जीवात जीव माझा गुंतलाय गं !!

रूप गोजिरं हे तुझं, मनात ठसलंय कसं..?
कोवळ्या फुलावर जणु, बसलं फुलपाखरू जसं !
साजनी मन फसलंय गं,
तुझ्या गोडगुलाबी हसण्यात रमलंय गं !!

व्यथा माझ्या मनाची सांग, सांगु कुणाला,
जखमा दिल्या तु अश्या, त्रास होतो जिवाला !
साजनी मला कळतंय गं,
तुझं मनं हि माझ्या प्रेमात भुललंय गं !!


             राणीसरकार फक्त तुझाच..
                      अखिल खैरे
                   ७७६९८७४४००