तू...

Started by Mangesh Shivaji Salunke, February 16, 2019, 06:47:51 AM

Previous topic - Next topic

Mangesh Shivaji Salunke

             तू...
   
डोळ्यातले दाटून आलेले अश्रू मी,
त्यामुळे डोळ्याची झालेली स्वच्छता तू,

पावसाळ्यातला पाऊस मी,
पावसाने भागणारी तहान तू,

आनंदात आलेले हसू मी,
हसण्याचे मूळ कारण तू,

बागेतील झाड मी,
झाडाचे गोड फळ तू,

माझ्या या जगण्याची प्रेरणा आहेस तू,
हृदयातून आवाज येतोय-'I Love you'


                    - मंगेश शिवाजी साळुंके