जेत्ता. .... (एक)

Started by Ashok_rokade24, February 16, 2019, 01:03:29 PM

Previous topic - Next topic

Ashok_rokade24

आयुष्य एक लढाई  ,
नित सामोरा गलेला ,
मी एक जेत्ता परि ,
जिंकूनही हरलेला ,

लढाया स्वकीयांच्या  ,
मुकपणी अनुभवलेला ,
न कळत निरागस सुंदर,
बालपण विसरलेला ,

मी एक जेत्ता परि ,
जिंकूनही हरलेला ,

परीभाषा प्रेमाची ,
न ऊमगलेला ,
परि स्वर्गीय स्वप्नी ,
नित रमलेला ,

मी एक जेत्ता परि ,
जिंकूनही हरलेला ,

कठोर ह्रदयी नित ,
आप्तेष्ट सोबतीला,
वाग्बाण विषारी,
घायाळ मन झालेला ,

मी एक जेत्ता परि ,
जिंकूनही हरलेला ,

देह प्रेमाचा चितेवर ,
जळतांना पाहणारा ,
ओंजळीत रक्षा चितेची ,
तन जिवंत, मन मेलेला ,

मी एक जेत्ता परि ,
जिंकूनही हरलेला ,

                            अशोक मु. रोकडे.
                              मुंबई.