तुझी व्याख्या

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, February 17, 2019, 12:59:25 PM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.तुझी व्याख्या*

तू साद घाल नव्याने
मी कानोसा घेत आहे
तू वाद घाल नव्याने
मी पूर्ण संमती देत आहे

तुझं लाजन सखे
भान हरपून नेणार
जशी तव्यावर भाकर
त्यावर प्रेम करपून देणार

गाली स्पर्शून गेली
तुझी मादक हवा ही
गुंगून गेलो कायमचा
त्याची मिळेना दवा ही

लपंडाव रोज असतो
ओठी बुजलेल्या शब्दांचा
मोकळीक जराशी मिळाली
चुंबन घेऊन कस्तुरी गंधाचा

ना दिवस आला माथी
ना रात्र ही कधी कळाली
पुस्तके चाळून झाली सारी
तुझी व्याख्या ना मिळाली

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर