वचन

Started by विनयकार, February 18, 2019, 03:08:26 PM

Previous topic - Next topic

विनयकार

रात्र होती ती
हवेत पसरलेल्या गारठयाची
पती येणार होता तिचा
देशाची सीमा ओलांडून
वाट पाहत होती ती
थंडीलाच पांघरुन भोवती.
दार वाजले
आसुसलेल्या हातांनी उघडले
पती परतले सीमेवरुन
भली मोठी बॅग पाठीवरती
देशरक्षणाची वर्दी तशीच शरिरावरती.
आत येऊन पत्नीला पाहीले डोळे भरुन
म्हणाला
येतानाच आला फोन
उद्याच बोलवल आहे पुन्हा सीमेवर.
पाळण्यातील जवानाला खेळवून गेला झोपी
पहाट होताच निघाला सीमेवरी
लवकर पुन्हा येईन तिज सांगुनी
युद्ध पुकारले होते कोणा शत्रुनी.
दिवस सरला रात्र झाली पुन्हा एकदा
हवेत तोच गारठा
अन पुन्हा ठोठावले दार कोणी.
पती परतला पुन्हा
आज बॅग पाठीवर नाही
पण कोणा माणसाच्या हाती.
आजही वर्दी शरिरावरती
परंतू तिरंग्यात लपेटलेली.
पाहू शकत नव्हता आज तो तिज
ना पाहू शकत होता जवान छोटा
वचन कधी तो मोडत नाही
लवकर येण्याचेही मोडले नाही.
थंडीच्या हवेमध्ये अन
अश्रुही हे गोठुन गेले माळरानावरी.