मंद प्रकाशी

Started by शिवाजी सांगळे, February 21, 2019, 05:26:38 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

मंद प्रकाशी

त्या चंद्र सावली डोहासाठी
व्याकूळ,वेडी,विरही धरती,
स्वैर सभोवती पोकळ नभी
शोधात फिरे एकाकी अंती !

मिलन म्हणू की विरहवेणा? 
उगवता न् एक अस्ता जाती,
युगे युगे का प्रहर टिकवितो
अर्धशृंगारीक ती धूसर नाती?

निळ्या जळात सावळ अंबर
मिळून एकत्र अलिप्त राहती,
स्पर्श वाऱ्याचे ते झुळझुळते
अंतरे का मग स्वयें मोजती?

धुके धरता ओटीत बाळसे
झरते पान्हे कशात विरती?
ओलसर गोंडस रूप घेता 
इंद्रधनू प्रकटण्या आतुरती !

तारकांच्या गूढ मंद प्रकाशी
आभास मनचे खेळ खेळती,
घेऊनीया सुर्य रोज उगवतो
ह्रदयस्थ धगीची नाती गोती !

© शिवाजी सांगळे 🎭
मो. ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९