पोस्टमन काका

Started by yallappa.kokane, February 22, 2019, 10:36:20 PM

Previous topic - Next topic

yallappa.kokane

पोस्टमन काका

आनंद अश्रू येणं बंद झालं
शब्दातला चेहरा आठवताना
आठवणीत रमणे बंद झालं
दुरून आलेलं पत्र वाचताना

झोळीमधल्या सुख दुःखाचं
घरी येणं आता बंद झालं
भ्रमणध्वनीच्या काळामध्ये
पोस्टमनचं येणं बंद झालं

एक पत्र लिहून पाहूया
देऊया जगण्याला मोका
घेऊन पुर्वीचे युग तुम्ही
परत या पोस्टमन काका!


यल्लप्पा सटवाजी कोकणे
२० फेब्रुवारी २०१९


९८९२५६७२६४
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर

शिवाजी सांगळे

खरं आहे, काळानुसार संदर्भ बदलले... आणि भावना कमजोर होऊ लागल्या.
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९