सखे या सांजवेळी...

Started by Mahesh Thite, February 23, 2019, 03:37:36 PM

Previous topic - Next topic

Mahesh Thite

सखे, या सांजवेळी पाहता तुला,
संतोष वाटे हृदयास माला।।

मंद वाऱ्यावरती थिरकणाऱ्या तुझ्या केसांच्या बटा,
त्याने शोभुनी दिसतो तुझा मुखवटा
या तुझ्या अदा आकर्षित करतात मला
सखे,या सांजवेळी पाहता तुला।

स्मितहास्य करताना तुझ्या गालावर पडणारी खळी,
लाजून केस सावरताना दिसणारी कानातली बाळी
या तुझ्या अदा मुग्ध करतात मला,
सखे, या सांजवेळी पाहता तुला।

उठवूनी नजर तुझी तू टाकतेस जेव्हा माझ्यावर कटाक्ष,
मजला घायाळ करिती त्यातून निघणारे नेत्रबाण लक्ष
तुझ्या गालावरची लाली घालते काळजावर घाला,
सखे, या सांजवेळी पाहता तुला।

सूर्य मावळतीला जात आहे तू जावू नकोस,
देशील साथ मला तर पुन्हा सोडू नकोस
हातात देऊनी हात वचन दे मला,
प्रत्येक सांजवेळी पहायचंय तुला।

सखे, या सांजवेळी पाहता तुला,
संतोष वाटे हृदयास मला।।