तुझ्याचं आसवांना

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, February 24, 2019, 04:48:32 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.तुझ्याचं आसवांना*

हृदयी नसतांना ही का स्वीकारले जरा मी
तुझ्याचं आसवांना का विचारले जरा मी

हट्ट तुझा असा ही होता
सारं काही विसरून जावं
मनातल्या मंदिरात अस
मृत्यू शय्येवर निजून रहावं

मन शांतीचे शब्द का आचारले जरा मी
तुझ्याचं आसवांना का विचारले जरा मी

अशीच मैफिल बसली
एक एक पेग पिण्याची
कळले नंतर असे ही
तू तार नव्हती त्या विण्याची

सूर हे नशिबाचे का तिरस्कारले जरा मी
तुझ्याचं आसवांना का विचारले जरा मी

दोष नव्हता माझा काही
माझे विचार गोंधळले होते
तुझ्या भोवताली सारं काही
म्हणून ते तिथंच रेंगाळले होते

विचार विझलेले का निखारले जरा मी
तुझ्याचं आसवांना का विचारले जरा मी

एव्हडीच एक चूक
मला चांगलीच भोवली
तुझ्यावर नाहक प्रेमाची
बीजे हृदयात या रोवली

नाहक प्रेमाचे वारे का संचारले जरा मी
तुझ्याचं आसवांना का विचारले जरा मी

तू माझीच आहेस ही
या मनाला खोटी आशा
आता सारं काही साफ झालं
उतरली सारी प्रेमाची नशा

जी चूक झाली तिला सुधारले जरा मी
तुझ्याचं आसवांना का विचारले जरा मी

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर