परीक्षा

Started by Mahesh Thite, February 24, 2019, 09:00:51 AM

Previous topic - Next topic

Mahesh Thite

First sem.संपले, second sem.संपले,आता आली परीक्षा
वर्षभराची एकाच महिन्यात भेटते आम्हा शिक्षा।।

Assignment लिहिता लिहिता होतो पुरता जाम,
Internal पेपरला निघतो पुरता घाम,
Clearance साठी department ला माराव्या लागतात चकरा,
त्यात प्राध्यापक लोकांचा सहन करायचा नखरा।।

Practical demo चा वेगळाच असतो थाट,
मात्र paper देताना लागते पुरती वाट,
Oral exam देताना सूचत नाही काही,
कसंबसं तेथून सटकण्याची होते फक्त घाई।।

Theory paper ला वर्गामध्ये वातावरण असते tight,
काठावर पास होण्यासाठी चालू असते fight,
हे सर्व करता करता होतो पुरता out,
All clear होतो की नाही याचाच फक्त doubt।।

First sem. संपले, second sem. संपले ,आता आली परीक्षा
वर्षभराची एकाच महिन्यात भेटते आम्हा शिक्षा।।

                                           ---महेश थिटे,
                                                 अहमदनगर




शिवाजी सांगळे

वाह,
परीक्षा देणाऱ्या कॉलेजच्या प्रत्येक विद्ध्यारत्याची भावना व्यक्त केलीत.
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

Mahesh Thite