विरह

Started by ANMOL201, February 27, 2019, 12:02:57 PM

Previous topic - Next topic

ANMOL201

आहे तरी काय खरे नि
आहे तरी काय खोटे,
अजूनही उलगडत नाही
मनातील एक कोडे.

तुझ्या स्वप्नात येताना
मीच स्वतः स्वप्न झाले,
तुझ्या गालावरती खाली पडताना
मीच स्वतः हसू झाले.

एकमेकांना पाहण्याची आपली हुरहूर
क्षणोक्षणी वाढत गेली,
मला तुझी नि तुला माझी
सतत चाहूल भासत गेली.

वाटले नव्हते कधीही
असे काही घडेल,
तुला माझे म्हणून
मी स्वतः कधी रडेल.   

तुला ईश्वर त्याच्याजवळ
इतक्या अलगद घेऊन जाईल,
माझी स्वप्न मात्र
माझ्याच आसवांसह वाहून जाईल.

तू गेलास अन अश्रुंचे
गळणे सुरु झाले,
तुला शेवटचे पाहीन म्हंटले
पण नाही ते शक्य झाले.

आहे तरी काय खोटे
सांग माझ्या प्रेमात,
सांगू तरी शकशील का रे
येऊनि माझ्या कानात.

9987389635