शांत झोप - पूर्वार्ध

Started by jambhekar, February 19, 2010, 04:00:33 PM

Previous topic - Next topic

jambhekar

जन्माला आलो आणि भोकाड पसरले  :'(
   आईने जवळ घेऊन थोपटले
त्या ऊबदार कुशीतच मला
लागत होती शांत झोप||१||

बघता बघता मोठा झालो
तान्हुल्याचा बाळ झालो
भुकेने कासावीस होता प्रेमाने भरवणे मिळत होते
आणि त्या प्रेमातच मला
लागत होती शांत झोप||२|| :P

रांगू  लागलो चालू लागलो
पळू लागलो बागडू लागलो
बाळाचे बालपण अनुभवू लागलो
बोबडे बोल बोलता बोलता
लागत होती शांत झोप||३|| ::)

आता शाळा सुरु झाली
गमभन अक्षरे गिरविली
पण त्याचबरोबर मस्ती केली
शिक्षकांचा मारही खाल्ला
पण तरीही मला
लागत होती शांत झोप||४|| ???

इयत्ता वाढल्या अभ्यास वाढला
वय वाढले मोठा झालो
पण तरी कधीही
टेन्शन घेऊन नाही जगलो
आणि म्हणूनच मला
लागत होती शांत झोप||५|| ;D

शाळा संपली निकाल आला
शाळकरी सोबत्यांचा निरोप घेतला
एक पर्व संपून गेले
आणि पुढच्या पर्वाची वाट पाहत
लागत होती शांत झोप||६|| :-\



उत्तरार्ध तुम्हीच लिहा.................