तू कधी प्रेम केलंच नाही

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, March 04, 2019, 09:17:32 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.तू कधी प्रेम केलंच नाही*

पाहिलं होतस का तू मला कधी
त्या क्षितिजा पल्याडून डोकतांना
नाही ना मग पाहून घेशील का
माझ्या अर्धवंट जळालेल्या देहाला
ते आज ही तिथंच पडून आहे
तू येण्याच्या अकांतात एकट

तुला विश्वास बसणार नाहीं ना
कसा बसेल तू कधी प्रेम केलंच नाही.....

कशी जादू केलीस कोणास ठाऊक
मी छिन्न विच्छिन्न झालो अन
तुझ्या नखरेल नजरेचा कायल झालो
पाहिलंस कधी तू तुझ्या आठवणींचे
ओरखडे आजही काळजाला आहेत

तुला विश्वास बसणार नाही ना
कसा बसेल तू कधी प्रेम केलंच नाही.....

लख्ख प्रकाशाची उंची जशी
नकळत तुला ही कळली नाही
अन मला ही कधी कळली नाही
काळा कुट्ट अंधार सोबत घेऊन
तुझ्यासाठी कविता लिहितांना
अश्रूंची खोली कधी मोजता आली नाही
अन तुझ्या डोळ्यांनी तू मला
अंतकरणातून कधी पाहिलंच नाही

तुला विश्वास बसणार नाही ना
कसा बसेल तू कधी प्रेम केलंच नाही.....

असो बघ आता सारं काही चालतंय
तुझ्या नसण्यांन ही हृदयाचं दार
अन उंबरा तुला पाहण्यासाठी
रात्रंदिवस वाटेकडे टक लावून झुरतोय
आपण जपून ठेवलेला आडोसा मरतोय
तुझे ते अगणित श्वास मोजण्यासाठी

तुला विश्वास बसणार नाही ना
कसा बसेल तू कधी प्रेम केलंच नाही.....

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर