उशीर

Started by योगेश.कृष्णात.पुजारी, March 07, 2019, 08:46:09 AM

Previous topic - Next topic
                 " उशीर "

ती कधी माझ्याकडे बघत असते
मी कधी तिच्याकडे बघत असतो,
पण समोरासमोर बोलणे आमचे होत नाही
माझ्याकडून बोलायला उशीर होतोय का?

माझ्याशी ती कधी बोलत नाही,याचा विचार मी करत असतो...
पण अचानक समोर आली कि सगळ्याचाच मला विसर पडतो..
माझ्या बोलण्याला उशीर होतोय का?

माझी नजर नेहमी तिलाच शोधत असते
कदाचित तिची नजर माझ्या नजरेची वाट पाहत असते..
नजर मिळाल्यावर ती गोड हसते
पण मलाच हसायला उशीर होतोय का?

काल तिने खुप वेळा पाहिले
माझेच लक्ष नव्हते,म्हणून मला कळले नाही
बघायला उशीर होतोय का?

सारखा सारखा तिचाच विचार करून
तिच्या मन भावना माझ्याकडून शब्दात
उतरवायला उशीर होतोय का?
     
                          - योगेश.कृष्णात.पुजारी
                             9421462612