झाला दुर अंधार !!!

Started by Ashok_rokade24, March 10, 2019, 12:24:57 PM

Previous topic - Next topic

Ashok_rokade24

ओसाड माळरान , निबिड अंधार ,
अंधारी जिवन सारे गुदमरले ,
पोटात वनवा भुकेचा , मुखी लाचारी ,
माणूसपण माणसाचे हरवले ,

अंथरूण अंधार, पांघरूण अंधार ,
अंधारी कितीही तन दडविले ,
वखवखलेली नजर लाडंग्याची ,
जे हवे तयांना ,नित साधीत गेले ,

चिरून अंधार , नमवूनी वादळ ,
वलय तेजोमय एक ऊभारले ,
एक ज्योत ईवलीसी पणतीची ,
लक्ष लक्ष दीप तिने ऊजळीले ,

तोडण्या श्रुंखला गुलामीच्या ,
भीमराव नित लढत राहिले,
तोडल्या रूढी ,खुळ्या कल्पना,
ज्ञान नवे प्रगतीचे आम्हा दिले ,

अभेद्य, अभंग कवच संविधानाचे ,
स्वरक्षणी आम्हा साठी घडविले,
जाती भेदाच्या तोडून भिंती ,
नवजिवन दान आम्हा दिले

झुगारून सारी लाचारी ,गुलामी ,
सुखी, आनंदी जीवन मिळविले ,
शिकुन ,संघटीत आम्हा करूनी ,
संघर्षातून आम्हास घडविले ,

बुध्दांचा मार्ग एकमेव सुखाचा ,
जीवन जगणे आम्हा शिकवले
बुध्दं, शरणं, गच्छामी त्रिवार ,
स्वर हे आसमंती निनादले ,

                             अशोक मु. रोकडे.
                              मुंबई.