तुझाच झालो मी....

Started by Mahesh Thite, March 12, 2019, 05:34:49 PM

Previous topic - Next topic

Mahesh Thite

पहिल्याच नजरेत तुला पाहता मुग्ध झालो मी,
सर्वस्व माझे हरपून तेव्हा तुझाच झालो मी।।

तुझ्या चेहऱ्यावर खेळणारे मंद मंद ते हास्य,
बोलताना ओठांतून निघणारे मधुर मधुर सुभाष्य,
बोलण्यासाठी आलो पण निशब्द झालो मी,
सर्वस्व माझे हरपून तेव्हा तुझाच झालो मी।।

चालताना रुनुझुनू करती तुझ्या पायातील पैंजण,
स्पर्श होता तुझा मला,शहारते माझे तन मन,
पुन्हा स्पर्श करण्या आलो, पण स्तब्ध झालो मी,
सर्वस्व माझे हरवून तेव्हा तुझाच झालो मी।।

केसांवर विराजून तूझ्या,मिरणारे ते गजरे,
शोभून दिसते त्याने तुझे ते रूप साजरे,
स्वतःला सवरण्या गेलो,पण तुझ्यात वाहत गेलो मी,
सर्वस्व माझे हरवून तेव्हाच तुझाच झालो मी।।

आजही तुझी आठवण येता, मी मलाच विसरतो,
सर्व काही सोडून, तुझाच विचार मी करतो,
तुझे वर्णन करायला गेलो तर कवी झालो मी,
या जन्मामध्ये कधीही,फक्त तुझाच आहे मी।।

                                              -- महेश थिटे,
                                                    अहमदनगर

Srlaholkar@gmail.com