धागा मैत्रीचा..

Started by borudeshitalr, March 13, 2019, 10:40:20 PM

Previous topic - Next topic

borudeshitalr

मैत्री तुटत चालली म्हणून
धागा लगेच साेडायचा नसताे...
एकाने धागा पकडून ठेवावा..
अन् त्याच मैत्रीवर विश्वास ठेऊन...
जरा धीर धरावा..
धाग्याची दुसरी बाजू तुटताना..
धागा आपोआपच जवळ येऊ लागेल..
पण तेव्हा मात्र मैत्रीच तेच नातं...
एका नवीन रूपात अनुभवयास मिळेल...
एकदा चूक झाली म्हणून...
धागा हा ताेडायचा नसताे...
कारण धागा हा जाेडण्यासाठी असताे...
म्हणून धागा लगेच साेडून द्यायचा नसताे...
त्याच मैत्रीवर विश्वास ठेऊन...
धागा घट्ट पकडून ठेवावा...
अन् जरा धीर धरावा...
मैत्रीच तेच नातं नवीन रूपात
उभारायला वेळ नाही लागणार..
अन् त्यानंतर मैत्री जपायला मात्र
आयुष्य पुरणार नाही..
       बाेरुडे शितल