तूच का मला आवडतेस ?

Started by surajrathi, March 15, 2019, 10:48:38 AM

Previous topic - Next topic

surajrathi


तूच का मला आवडतेस ?
मला नाही माहिती ,
पण खूप आवडतेस ,
इतकच मला माहिती ....

ना तू  कुठली राजकुमारी ,ना तू खूप सुंदर,
तरीही तू खूप छळतेस  मला,
किती लाजल्यासारखं होतं माहितीय ?
हळूच हसऱ्या नजरेने जेव्हा बघतेस तू  मला.

असताना सोबत तुझ्या काय सांगू...वाटतं कसं?
चिखलात कमळाचं अलगत फुल उमलावं तसं,
स्पर्शाने तुझ्या काय सांगू...वाटतं कसं?
मयूरपंखाने अंगावरून सरकावं तसं...

तू  काहीही केले तरी मला  ते सुंदरच वाटते,
प्रेमाने  तुला बघण्याची माझी नजरच तशी.
तू नेहमी विचारतेस  ना मी इतका साधा सरळ कसा ?
इतका साधा सरळ नाही ग  मी, जेवढी तू मला समजतेस
माझा स्वभाव अन तुझी बघण्याची नजरच तशी.

आवडतं मला तुझं.....माझ्या स्वप्नात येणं,
माझा हात चालता चालता तुझ्या हातात घेणं
हे सगळं असंच मला आयुष्यभर देशील का?
स्वर्ग नकोय मला...असंच नेहमी तुझी साथ मला देशील  का?

अक्षरश: वेडा आहे मी तुझ्यासाठी,
फक्त एक कर माझ्यासाठी..
बाकी काही नाही दिलेस तरी चालेल,
फक्त खूप आठवणी दे मला....
तुझी सोबत नसतानाही  हसण्यासाठी....
Written by -SR