बस्स आता काहीच नको

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, March 15, 2019, 11:43:11 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.बस्स आता काहीच नको*

मी जातो आता सरणावर सखे
विश्वास नव्हता तेव्हा मरणावर सखे

वारा सोबत देईल
धरणी सुगंधित होईल
मी जातांना ही बघ
तुझ्या नकळत त्यांची सोबत घेईल
असो आता सारं काही माफ झालं
तुझ्या जाण्याच गुपित ध्यानी आलं
माझं दारिद्रय माझी गरिबी
हिचं झाली आयुष्याची खराबी
एव्हड प्रेम देऊन हृदय ही जळालं
मिलनाची गोष्ट खोटी हे शेवटी कळालं

मी जातो आता सरणावर सखे
विश्वास नव्हता तेव्हा मरणावर सखे

पाय घड्या अंथरल्या जातील
मयत माझी खांद्यावर घेतील
चुकून सुद्धा अडवी येऊ नकोस
अन पुन्हा तू माझी होऊ नकोस
जायचं आहे मला जाऊदे आता 2
भंगलेल्या स्वप्नातून मुक्त होऊ दे आता
सोडलस तू दुःख याचं नाही
जातांना फक्त बोलली नाहीस काही

मी जातो आता सरणावर सखे
विश्वास नव्हता तेव्हा मरणावर सखे

तू ओढून येशील लग्नाची ओढणी
तेव्हाच होत होती चितेची मांडणी
लाख मयतीला जमले असतील माझ्या
ते ही कसे विरहात रमले असतील माझ्या
आज मी असेल अन तू ही असशील
मी अग्नीत अन सात फेरे
तू दुसऱ्या सोबत घेशील
नशीब चिमूट भर तरी तांदूळ टाकशील
अन नकळत तू श्रद्धांजली वाहशील
बस्स आता काहीच नको
बस्स आता काहीच नको

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर