मनातील भावना

Started by sneha31, March 15, 2019, 07:23:45 PM

Previous topic - Next topic

sneha31


स्वप्नांच्या दुनियेत रंगूनी सागरी किनाऱ्यावर बसते
पायाखालची वाळु सरकताच सगळ्या आठवणी पुसुनी जाते
हळूच जवळ बसुनी तू  हाथ माझा हाथी घेतो
डोळे उघडताच मी.....तू असल्याचे भास मला जाणवतो....

रम्य तुझ्या आठवणीत चंद्राकडे बघत बसते
लुकलूकणाऱ्या चांदण्या तुझीच चाहूल देते
मंद हवेच झुळुक येताच स्पर्श तुझा होतो
डोळे उघडताच मी....तू असल्याचे भास मला जाणवतो....

आतुरलेली असतांना तुझ्या भेटीसाठी
मनातील शब्द लिहिते कवितेत तुझ्यासाठी
अव्यक्त त्या मनातील भावना व्यक्त मी करते
डोळे उघडताच मी....तू असल्याचे भास मला जाणवते....

असशील तू कितीही दूर जवळ माञ माझ्या असतोस
खोट का असेना पण स्वप्नात मात्र दिसतोस
स्वप्नातूनी जेव्हा जाग येते तेव्हा पहाट होऊन जाते
डोळे उघडताच मी.... तू असल्याचे भास मला जाणवते....

स्नेहा माटूरकर