प्रेम नाजूक धागा

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, March 16, 2019, 07:12:45 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

दि.१६/३/२०१९

*शीर्षक.प्रेम नाजूक धागा*

सखे तू टिपूर चांदण
मी वेडावली हवा
ठाव घेई काळजाचा
विझणारा तो दिवा

तुझं लाजनं सखे
गंध फुलांचा नाजूक
दिस मावळतीला जाता
अंगी शहारा अंधूक

ये एकदाच सखे
घाट ओलांडून जाऊ
डाव प्रीतीचा हा सारा
आता डोई घेऊन राहू

रूप साजिर गोजिर
मी दगडी हा पाटा
घेऊ एकत्र करून
दुभंगलेल्या गं वाटा

सैल कर जरासं
सखे शृंगाराच लेण
प्रकाश देईल जीवनी
होऊन मेणबत्तीच मेण

प्रेम नाजूक धागा
घेऊ जुळवून आता
नको नाक मुरडू सखे
तुझा नकळत मी होता

एकांत भेटला आहे
शांत आता रात्रीचा
कोण नाही सोबतीला
आधार आभाळ छत्रीचा

डाव खेळू चल दोघे
संसारी सारीपाटाचा
सुरुवात करू नव्याने
मुका घेऊन ओठांचा

लाजू नकोस आता
देव आहे हा साक्षीला
दाद दिली आहे त्यानं
मागितलेल्या भिक्षेला

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर

Shree gadekar

असेच आपण आयुष्यभर
दोघे सोबतच राहावे
एवढेच माझे स्वप्न आहे
जे दोघांनी मिळून पहावे...
आयुष्यात दोघांच्या नेहमी
सर्व काही सुंदर असावे
लागावी नाही कोणाची नजर
असे दोघांनीही वागावे...
एवढेच माझे स्वप्न आहे
जे दोघांनी मिळून पहावे...
                                     shreegadekar....

sanjay teli

I like your poems very nice keep writing more poems
you can go through my site for hindi poems hope you will like it

https://poembysanjayt.blogspot.com