मनाची घालमेल

Started by tanksale.ajinkya1012, March 18, 2019, 01:00:16 PM

Previous topic - Next topic

tanksale.ajinkya1012

मनात दबलेल्या भावनांना, आता बाहेर काढायचंय |
खूप झाला दुरावा, आता तुला सगळं सांगायचंय ||१||

तुला पाहून लपवलेल्या नजरेला,
आता वळणावर आणायचंय |
तुझ्या नजरेत नजर मिळवून,
आता तुला सत्य सांगायचंय ||२||

स्वप्नात जगत असलेल्या जीवनाला,
आता अस्तित्वात आणायचंय|
तूझ्या प्रत्येक आभासाला, आता जिवंत करायचंय ||३||

दुःखात राहून थकलो, आता तुझ्या सहवासाचं सुख अनुभवायचंय |
खूप झालं लपवणं, आता माझं प्रेम मला व्यक्त करायचंय ||४||

sanjay teli

I like your poems very nice keep writing more poems
you can go through my site for hindi poems hope you will like it 
https://poembysanjayt.blogspot.com