बाप

Started by Mahesh Thite, March 21, 2019, 10:03:54 PM

Previous topic - Next topic

Mahesh Thite

सन्माननीय कवी इंद्रजित भालेराव यांची क्षमा मागून मी ही कविता लिहीन्याचे धारिष्ट्य दाखवतो. *बाप* या कवितेचे विडंबन करून निवडणुकीतील घराणेशाही पद्धतीवर घाव घालण्याचा हा छोटासा प्रयत्न.....

         *बाप*

मतदार संघात माझी छाप,
सोबत नोटांची आहे साथ,
सत्तेसाठी राबतो कष्टतो,
माझा पुढारी बाप ।।

लेतो अंगावर खादी,
खातो गरिबांचा माल,
काढी कॉन्ट्रॅक्ट मधून पैसे,
खानदान कराया मालामाल
संघर्ष त्याच्याच का माथी,
त्यानं काय केलं पाप?

माझा बाप पुढारी,
उभ्या खानदानाचा पोशिंदा,
त्याचा नावे लिहिलेल्या,
शिक्षणसंस्था,पतसंस्था
कष्ट सारे त्याचे हाती
लोकांच्या हाती मतदान ।।

दूरदूर माझे कारखाने
शहराच्या पलीकडे
पाठ राखती तयाची
बागायतदारांचे ऊसमळे
आम्ही घोटाळ्यांचं खातो
लोक करिती आंदोलन ।।

बाप विरोधी पक्षाला
माय सत्ताधारी पक्षाला
निवडणुकीच्या खेळाची
काय गंमत सांगू तुला
आम्ही भ्रष्टाचाराचचं खातो
लोक करिती उगा कष्ट ।।
                     
                     --महेश थिटे,
                         अहमदनगर
                          9156989636