पाणी द्या रे कुणी......

Started by Mahesh Thite, March 25, 2019, 05:06:28 PM

Previous topic - Next topic

Mahesh Thite

                  पाणी द्या रे कुणी......

विहिरी आटल्या, तलाव आटले,संपले सारे पाणी,
डोळ्यांत आसवे आणण्यापुरते पाणी द्या रे कुणी ।।

पिकं सारी करपुनी गेली,धरणीची लाही झाली,
वाढणाऱ्या उन्हासोबत,जमीन पुरती भेगाडत गेली।
आता भेगाडणाऱ्या जीवाला मलम लावा कुणी,
डोळ्यांत आसवे आणण्यापुरते पाणी द्या रे कुणी ।।

दोन घोट पाण्यासाठी साऱ्या भुईची चाळण केली,
पाणी पाणी करून गुरेढोरे मेली ।
आता मरणाऱ्या माणसांवर अमृत शिंपडा कुणी,
डोळ्यांत आसवे आणण्यापुरते पाणी द्या रे कुणी ।।

आटणाऱ्या पाण्याबरोबर माणुसकीही आटत चालली,
पैश्याच्या पावसासाठी IPL ला पाणी वाटत चालली।
मैदानापेक्षा आमच्या जळत्या हृदयावर पाणी शिंपडा कुणी,
डोळ्यांत आसवे आणण्यापुरते पाणी द्या रे कुणी ।।

बोलून बोलून थकलो मी, घासा माझा कोरडा झालाय,
दोन घोट पाण्यासाठी जीव माझा आटत चाललाय।
निवडणुकीच्या धामधुमीत, आमचा आवाज ऐका रे कोणी,
डोळ्यांत आसवे आणण्यापुरते पाणी द्या रे कुणी ।।

                                          -- महेश थिटे,
                                               अहमदनगर,
                                                9156989636