पावसात भिजण्याचे

Started by कवी कु. अभय अनंतराव मोहोड, March 26, 2019, 12:22:17 PM

Previous topic - Next topic
 
:'( :(
तू नसताना राहीले नाही
भान ऋतु बदलण्याचे,
यावर्षी ही राहून गेले
पावसात भिजण्याचे
:( :'(
चेहर्याभवरती येऊन पडावे
सडे थंडगार पाण्याचे,
त्यावेळी ही स्मरण व्हावे
तुझ्या बेधुंद हास्ण्याचे

का वाटावे भय मनाला
मुसळधार पाण्याचे,
का वाटावे अप्रुप जीवाला
मुकाट रिमझिमण्याचे

अजुनही आहे वाट्यास माझ्या
झोपेत जागण्याचे,
कधी संपेल कार्य तुझे
हे मला दुखावण्याचे

लागे वेध पुन्हा मनाला
नव्याने जगण्याचे,
पण तरीही ना होई धाडस
तुला विसरण्याचे
:( ::)


कवी :- कु. अभय अ. मोहोड