गरीबाला स्वाभिमान नसतो

Started by कवी कु. अभय अनंतराव मोहोड, March 26, 2019, 12:47:13 PM

Previous topic - Next topic
[img src="https://goo.gl/images/5JBYv9"]https://goo.gl/images/5JBYv9[/img]

:( ::) :-[ :o
दारिद्र्यात जन्म घेतो
गरीब म्हणून वावरतो,
आणि मग आयुष्यभर जन्मदात्यांना दोष देतो कारण;
"गरीबाला स्वाभिमान नसतो..."

कधी नव्हे ते नातलग आठवतो
तर नात्यातुनच बहीषक्रुत होतो,
तरीही नातं टीकवायच म्हणतो कारण;
"गरीबाला स्वाभिमान नसतो..."
:( ::) :-[ :o
श्रीमंताची चाकरी करतो
गुन्हा नसताना प्रसंगी जोडे खातो,
याच श्रीमंतीच्या जोड्याखाली वेडा
सुखी संसाराची स्वप्न पाहतो कारण;
"गरीबाला स्वाभिमान नसतो..."

बापदादांनी फुकायला काहीच ठेवले
नाही म्हणून बोंबलतो
आणि शेजारच्यांची प्रगती पाहून
आतल्या आत जळतो,
म्हणून हा कर्मदरिद्री नशीबाला दोष देतो का ? तर;
"गरीबाला स्वाभिमान नसतो..."
   
:( ::) :-[ :o
गरीबाने कुणाशीही नडायच नसतं
गरीबाने हक्कासाठी लढायच नसतं,
असली भ्याड तत्त्व बाळगून
पदोपदी सिद्ध करतो की;
"गरीबाला स्वाभिमान नसतो..."

शेतात राबतो, धान्य पिकवतो
पृथ्वीच्या गर्भातून जणू सोनं उगवतो,
एके दिवशी हेच सोनं बाजारात
कवडी मोलान विकतो अर्थात;
"गरीबाला स्वाभिमान नसतो..."

एकीकडे बायकांनी स्वाभिमानाने
जगावे अस म्हणतो
अन् मग स्वतःच्याच बायको-मुलींवर
लांडग्यांची वाईट नजर का सहन करतो कारण; स्पष्ट आहे,
"गरीबाला स्वाभिमान नसतो..."
:( ::) :-[ :o
मनातल्या मनात अन्यायाविरुद्ध
वणवा पेटवायचा
आणि याच आगीत स्वतः
धुमसून धुमसून जीव दयायचा,
असलं जगणं जगून एक वाक्य सारख अधोरेखीत करतो की;
"गरीबाला स्वाभिमान नसतो..."
:( ::) :-[ :o


कवी:- कु. अभय अ. मोहोड