वर्तुळ प्रीतीचं

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, March 27, 2019, 07:32:46 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.वर्तुळ प्रीतीचं*

रंग नव्याने माझ्या सवे जोडतो तुझ्यामुळे
जात माझी रक्तात सांडतो तुझ्यामुळे

चांदणे शापित का असे झाले गं सखे
काजव्यांशी का उगा भांडतो तुझ्यामुळे

जमलं जरासं आखण्या वर्तुळ प्रीतीचं
नव्वद अंश मोजण्या खोडतो तुझ्यामुळे

दारात आरास आली नटून तुळशीची
पूजण्या जुने वृंदावन पाडतो तुझ्यामुळे

डोहाळे लागले तुला प्रेमाचे आज
जळणाऱ्या कैऱ्या कांडतो तुझ्यामुळे

पाहून आलो स्मशान सखे नव्याने मी
अंतरात मरून हृदय गाडतो तुझ्यामुळे

तुझ्या आठवणीत रंगल्या बघ कविता
अश्रू जोडून बनलेल्या फाडतो तुझ्यामुळे

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर