प्रेम कविता

Started by chittmanthan.ooo, March 27, 2019, 11:57:19 PM

Previous topic - Next topic

chittmanthan.ooo

काही दिवांपूर्वी लायब्ररी मध्ये एक नवीन मुलगी आली.
पहला प्यार बार बार आणि लगातार होण्यामागे ज्या मुली असतात त्यातलीच एक...
जेमतेम पावणेपाच फूट उंचीची.. पाहताक्षणी मनाला भावणारी आणि जिच्या डोळ्यात पाहताना आयुष्य सहजसरशी निघून जाईल अशी....!!!
तिच्या कपाळावरची चंद्रकोर तीच सौंदर्य अजूनच खुलवयची...
ती जेव्हा समोर यायची तेव्हा माझ मन दगडु (from timepass movie) ऊन जायचं...!
वाटायचं हीच आपली प्राजू...!!!
तिला वाचताना पहायचो तेव्हा ती रागाने पुस्तकात बघताना दिसायची...
रागाने वाचायची सवय आहे की मी बघतोय याचा राग आलाय हे कळायचं नाही...
तिच्याबद्दल Google करताना अस कळलं की तिच्या शेजारी बसणारा तिचा सीनिअर तिचा boyfriend असू शकतो...!!
मनाला खोटं वाटलं म्हणून आणखीन गूगल केलं..
तिथं तिचा boyfriend आहे की नाही हे नाही कळलं पण ती एक भावनाशील लेखिका आहे हे कळलं...
तिचा कोकणाबद्दलचा लेख वाचताना आपण कोकणातला माड म्हणूनसद्धा का जन्माला आलो नाही याचं दुःख झालं...
पण नंतर वाटलं आपण नाही निदान आपलं प्रेम(चौथयांदा झालेलं पहिलं प्रेम) तरी कोकणातल आहे....
कोकणातला हापूस,माडाच्या बागा.. कौलारु घरं आणि निळ्याशार समुद्रानंतर भारी वाटलेली गोष्ट म्हणजे ती...
ती प्राजू होईल की नाही माहीत नाही पण तीच "तू एक चांगली लेखिका आहेस " अस कौतुक करावं असं वाटलं...
पण धाडस झालं नाही...
तिच्याबद्दल चा विचारांच्या लाटा मनावर आदळत असतानाच मी लिहिता झालो....!!!!
www.chittmanthan.ooo