मी अता तुला हे

Started by Vijay143, March 30, 2019, 09:47:18 AM

Previous topic - Next topic

Vijay143


मुग्ध मानसी यांची सुंदर रचना वाचल्यावर बिर्याणीचा मोह आवरेना.

मी अता तुला हे बिर्याणीचे सांगणार आहे!
'नकोस कांदे कापू येथे' बजावणार आहे!

असोत ते जे पाकपुस्तकी धरून करती मजा
मी मात्र तुला नेहमी उपाशी ठेवणार आहे!

पटूदे अथवा न पटो तुजला माझे हे सांगणे
हाच घास बघ तुझ्या गळीही उतरणार आहे!

तू काटे दे वा चमचे, डाव, सराटे दे मजला
तरी शेवटी मीच तुला बघ भरवणार आहे!

लाख नियम पाळूनही जेंव्हा मी करते रोटी
ट्रेडमिलवर तुला धाडूनी पळवणार आहे!


खाव खाव तुझी रे जाड्या जा माझ्यापासून दूर
अखेर तुला मी त्या जिममधेच धाडणार आहे!
                                                                        
LIC Merchant