कोपरे हृदयाचे

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, March 31, 2019, 08:13:17 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक. कोपरे हृदयाचे*

असा हा कोणाता झाला भाव अपुरा
हृदय जळत राहिलं अन घाव अपुरा

पत्ता ना मिळाला शेजारी पुस्तकाचा
फसलाच दुष्मणाचा तो डाव अपुरा

लेखणी म्हणाली चल सोडून दे प्रीत
गवसलीच नाही ती त्यात ठाव अपुरा

जरासे साळून झाले कोपरे हृदयाचे
प्रेमातला हा तुझा खोटा लपंडाव अपुरा

अक्षरे समजली नाही ओळीतली त्या
त्यांचा झाला नाही तो निभाव अपुरा

तुला समजायचं तू समजून गेलीस
पण राहिला बघ तुझा हा बनाव अपुरा

शेवटी तू सांगितलं नाहीस मला ही
तुझ्या नजरेतला मी होतो राव अपुरा

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर 8)