तुला ना मला

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, April 14, 2019, 11:27:29 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.तुला ना मला*

तुला ना मला अशी का खबर असते
वेदना आपली माझी का तुझी नसते

गाव जाग व्हायचं
पादचारी मी व्हायचो
या हातातून त्या हाती
जेव्हा जरा मी जायचो

नजर त्यांची माझ्याकडे पाहून रुसते
वेदना आपली माझी का तुझी नसते

शिंतोडे उडवले
लोकांनी चव्हाट्यावर
तोंड सुख घेतले त्यांनी
जे नव्हते बोहल्यावर

जेव्हा माझ्या प्रेमाची यांना इंगळी डसते
वेदना आपली माझी का तुझी नसते

रान झाकले मी
आपल्या प्रेमाचे
आग लावली यांनी
ते होते यांच्या नेमाचे

फासतांना काळीक तू अशी का हसते
वेदना आपली माझी का तुझी नसते

कलंक झालो मी
माझ्या समाजाला
जेव्हा बांधले तू
फास माझ्या गळ्याला

तुझ्या विरहाची दोर जशी जशी कसते
वेदना आपली माझी का तुझी नसते

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर