हृदयाची समजूत

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, April 16, 2019, 06:52:59 PM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.हृदयाची समजूत*

तुला मिळवण्याचा आटा पिटा
कळून जायचा जेव्हा तू समोरून जायची
हृदय बाहेर येण्याचा प्रयत्न करायचं
पण तेव्हा एक गोष्ट लक्षात यायची
बस आता मागे फिरून इथेच मरायचं

पुन्हा रात्र थांबायची पुन्हा रंग भरायचे
हृदयाला समजावून तुझे चित्र उभारायचे

कळून जायचं मग पुन्हा काळोखी रंग
होणार जीवनाचा तोच आता बेरंग
कविता उतरायला सुरुवात व्हायची
लेखणीत जणू तू भरून पुन्हा यायची
लिहायला जायचो तुला कागदावर
कागद चिंब होऊन आरोळी द्यायचा
तुझ्या आठवणींना .......

पुन्हा रात्र थांबायची पुन्हा रंग भरायचे
हृदयाला समजावून तुझे चित्र उभारायचे

अस किती चालणार कोणास ठाऊक
आता हृदयाने किती दिवस झुरायचं
शब्द शब्द गोठून त्यानं ही किती उरायचं
माझ्यासाठी हृदयाला दोष देऊ नको
जाईल असाच मरून कठोर तू होऊ नको
माहीत आहे मला चूक माझी आहे
कारण प्रेम मी केलं होतं
म्हणून तर माझं हृदय आडवं येतं

पुन्हा रात्र थांबायची पुन्हा रंग भरायचे
हृदयाला समजावून तुझे चित्र उभारायचे

दिवस जवळ आलेत
स्वप्न सारे संपून गेलेत
तुझ्यासाठी जगतांना
हृदयाला जरासं जपतांना
मरण जवळ आलं
स्वतः साठी जगणं राहून गेलं
सरण मात्र रचलं जाईल
श्वास माझा मोकळा होईल
हृदयासाठी रेखाटलेले चित्र जाळू नको
एक मोकळीक राहील तुला
मी गेल्याचं सुतक मात्र पाळू नको

नाही केलंस असं तर .....

पुन्हा रात्र थांबायची पुन्हा रंग भरायचे
हृदयाला समजावून तुझे चित्र उभारायचे

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर