विसावलेले स्वप्न

Started by schaitanya, April 23, 2019, 11:43:14 PM

Previous topic - Next topic

schaitanya

नशिबाने भविष्याची आस दाखवत
बरेचदा फसावल होतं,
मी आभारी आहे तिचा
एक स्वप्न माझ्या पण मांडीवर विसावल होत.

कितीतरी वेळ तिच्या केसात
हात फिरवत राहिलो.
तिला मिळवण्याचा
आठहास घेऊन मिरवत राहिलो
जो पर्यत आयुष्यात आहे तो प्रयन्त तिने हसावल होत.
मी आभारी आहे तिचा
एक स्वप्न माझ्या पण मांडीवर विसावल होत.

शरीरचे नियम मनावर घालून
त्यांना पाळीत राहिले
माहीत होतं सोडून जाणार आपल्याला
म्हणून जेवढ होईल तेवढे फक्त कुरवाळीत राहिलो.
मनाच माहीत ती माझी आहे एवड तिने भसावला होत
मी आभारी आहे तिचा
एक स्वप्न माझ्या पण मांडीवर विसावल होत.
#आठवणीतील_राजा_राणी