स्पँरो ताई

Started by शिवाजी सांगळे, May 01, 2019, 08:35:34 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

स्पँरो ताई

घास भरवता म्हणते आई
कुठे हरवलीस तु गं बाई?
स्पँरो ताई अगं स्पँरो ताई
लाँग टाईम तु दिसली नाही !

वळचण गेली नी सारं गेलं
पिलांचा पण ट्विटर नाही,
तु नाही ते कळतंय लगेच
रेस्ट बर्डस् बी दिसत नाही !

उरलीत झाडं फारच कमी
लाँगवर कुठे हिरवळ नाही,
सिमेंटच्या या फॉरेस्टमध्ये
रहायला तुला हाऊस नाही !

© शिवाजी सांगळे 🎭
मो. ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९