आणि कॉलेज लाईफ संपल....

Started by Rushi.VilasRao, May 05, 2019, 10:07:19 PM

Previous topic - Next topic

Rushi.VilasRao

*आणि कॉलेज संपल....*


शेवटचा पेपर लिहीत होतो....
खर तर शेवटच्या पेपर चा शेवचाच प्रश्न लिहीत होतो...
क्लास मधल्या सरांनी शेवटची ३० मिनिट राहिली म्हणून सांगितलं....
वेळ संपत आली हे दर्शवन्यासाठी घंटेचा शेवटचा टोल वाजला....
पेपर लिहीता लिहीता अचानक मन सुन्न झालं... मनातल्या मनात घड्याळाचे काटे उलटे फिरले.....
घेवून गेले त्या जुन्या आठवणीं मधे....
कॉलेज चे ते दिवस डोळ्या समोर फिरू लागले....
मनात विचार आला किती भराभर गेले ना हे दिवस...
काही कळल च नाही....
सगळ अगदी अचानक पने घडल्या प्रमाणेच...
काही कळलं च नाही कसे गेले ते दिवस....
कॉलेज लाईफ संपल....
आता उद्या पासून कसली हजेरी नाही....
कसले तास नाही....
कसले प्रॅक्टिकल नाही ना कसले लेक्चर सुद्धा नाही....
या सगळ्या गोष्टींची वाटणारी *कटकट* आता राहणार नाही.....
पण हे लेक्चर्स बुडवून खाली गार्डन मधे बसण्याची माजाच काही वेगळी होती.....
मित्रांसोबत केलेल्या पार्ट्या त्यांच्या त्या गप्पा....
चेष्टा मस्करी सगळ काही क्रमा क्रमाने आठवू लागल....
आयुष्याची दिशाच आता बदलणार होती....
सर्व काही हरवणार होत....
आठवणींच्या सावलीत सर्व काही निवांत झोपी गेल्या प्रमाणे होणार होत.....
कॉलेज मधे नवीन नवीन कपडे घालून मिरवणारे स्टाईल मारणारे आता कुठे तरी जॉब ला लागून फॉर्मल मधे राहणार होते....
कारण फक्त एकच होत....
Writer:-Rushikesh Kadam (मी स्वतःच)
कॉलेज लाईफ संपणार होत....
प्रेझेंटेशन याच्या त्याझ्यां कडून घेटल्येल्या नोट्स सबमिशन प्रोजेक्ट आणि प्रोजेक्ट च्या नावाखाली केलेली मौज मजा भटकंती काहीच शिल्लक राहणार न्हवत....
बघता बघता आयुष्यातली ३ वर्ष संपली....
सगळ जणू काही इतिहास जमा होणार होत....
कारण आयुष्यातली कॉलेज लाईफ नावाचं एक गोड संपणार होत....
आता आयुष्यात सगळी उलथा पालथ होणार होती...
भविष्याचा विचार मनात रंगत होता....
तेवढ्यात अचानक शिक्षकांनी हातातला पेपर काढून घेतला आणि स्वप्नांच्या दुनियेतून सत्त्यात आलो.... हातातला पेन खाली ठेवला आणि एक सुटकेचा श्वास सोडल्या प्रमाणे शांत झालो...
आणि शेवटी एकच विचार उरला तो....
*_आपल कॉलेज लाईफ संपल...._*
writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)
Follow on Instagram for awesome posts @Krushi_bhaijaan


Vinodraj patil

खूप छान सर मला पण आवड आहे कविता लिहिण्याची देशावर आई बाबा यांच्यावर माझ्या कॉलेज वर निसर्गावर मला गाईड कराल तर आजू चांगली लिहिण्याची तयारी असेल सर

Rushi.VilasRao

Ho Avdel mala nakki tumhala guide karaila!👍 pn tya adhi tumhi swata kelelya kavita mala dakhava mg me tumhala sangel kuthe badal karta yeil kiva ajun kashi chan hoil kavita...!😇
Tumhi mla Instagram la message karu shakta