नातं जपतांना

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, May 11, 2019, 12:28:29 PM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.नातं जपतांना*

एक लक्षात आलं जरासं
नातं जपतांना तुझ्याशी
तुझ्यासारखचं आज ते
परकं वागलं माझ्याशी

तुझी माझी जातं एक नाही
रक्त मात्र आरोळी देत होतं
कोण कुठला मी असाच
शेवटी टाहो फोडत होतं

श्वास दुभंगले असतांना
ओठांची दयना झाली होती
खाना खुणा चालूच राहिल्या
पण रात्र सारी संपली होती

चल सोड तू सारं काही
हे फक्त स्वप्नातलं गणित होतं
सावलीचा खेळ हा सारा
शेवटी मरण लिखित होतं

तुझ्यामुळंच आयुष्याला
दुःख आज भेटलं होतं
सरण जळतं राहील माझं
काळीज मात्र पेटलं नव्हतं

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर