रस्ता

Started by Sagar salvi, May 20, 2019, 11:15:42 AM

Previous topic - Next topic

Sagar salvi

ती येण्याचा रस्ता !

तो रस्ता आतुरलेला
पाहत तुझी वाट,
कधी तो सरळ असायचा
कधी वळणावरचा घाट.

विनवणी करायचा झाडांना
फुलं पांघर माझ्यावर,
थोडी फुलं वाचवून ठेव
वरून शिंपड आल्यावर.

हवेलाही सांगत होता
सुकलेली पानं वेगळी धर,
पानांवरच्या दवबिंदूंचे
ती आली की पाऊस कर.

फांद्यांनाही सांगायचा
वाचवून ठेवा सावली थोडी,
त्या बाकड्यावर बांधापाहू
त्या सावलीची नाजूक होडी.

तो रस्ता कधी न काळी
इतका शहाणा वागला,
ती येण्याच्या वेळीच त्याचा
नेमका डोळा लागला.

Sagar salvi


ती येण्याचा रस्ता !

तो रस्ता आतुरलेला
पाहत तुझी वाट,
कधी तो सरळ असायचा
कधी वळणावरचा घाट.

विनवणी करायचा झाडांना
फुलं पांघर माझ्यावर,
थोडी फुलं वाचवून ठेव
वरून शिंपड आल्यावर.

हवेलाही सांगत होता
सुकलेली पानं वेगळी धर,
पानांवरच्या दवबिंदूंचे
ती आली की पाऊस कर.

फांद्यांनाही सांगायचा
वाचवून ठेवा सावली थोडी,
त्या बाकड्यावर बांधापाहू
त्या सावलीची नाजूक होडी.

तो रस्ता कधी न काळी
इतका शहाणा वागला,
ती येण्याच्या वेळीच त्याचा
नेमका डोळा लागला.