पायरी

Started by Sagar salvi, May 20, 2019, 03:56:16 PM

Previous topic - Next topic

Sagar salvi

पायरीवरचा शब्द !
ते शब्द पायरी वर
अजूनही बसले आहेत,
उठण्याचा प्रयत्न करतात
पाय मात्र फसले आहेत.

समोरून येताना दिसतात
पुढे गेलो की आवाज देतात,
बघणं जरी टाळतो आपण
आवाज मनातली जागा घेतात.

पायरीवरचा शब्द नेहमी
पायरीवरच राहतो,
आत फक्त ओळी जातात
शब्द बाहेर वाहतो.

सगळीजणं आत जातात
आतली पेटी भरायला,
शब्दांकडे बाहेर एकच हात आहे
फाटकी झोळी धरायला.

बाहेरचा शब्द आत पाहतो
अधे मधे चोरून,
आतला शब्द बघतो त्याला
त्याच्या पायरी वरून.