पुस्तक

Started by Sagar salvi, May 21, 2019, 01:02:43 AM

Previous topic - Next topic

Sagar salvi

पुस्तकांशी मैत्री !
पुस्तकं सुद्धा घाबरी होतात
माझ्यासमोर बोलताना ,
मीही अलगद मान देतो
प्रत्येक पान खोलताना.

कधी कधी पानं चाळली जातात,
काही कळत नसताना,
कधी कधी पानं माळली जातात
नुसतं पळत असताना.

काही शब्द वेचून वेचून
माझी रिकामी झोळी भरतो,
उगाच कधी त्या पुस्तकाची
पानं नुसती ओली करतो.

रागवत नाही, रुसत नाही
पान काहीतरी देऊन जातात, 
नाहीच घेता आलं मला काही
पानाचा नंबर ठेऊन जातात.

पुस्तकाच्या त्या वाटेवर
पुन्हा फेरफटका मारावा,
तीच पानं बहुतेकवेळा
कमी करतात दुरावा.

तेच शब्द, तीच वाक्य
अर्थ नविन सांगतात,
न कळलेले शब्द तेंव्हा
जिभेवरती रांगतात.