अनुभव

Started by Sagar salvi, May 21, 2019, 10:25:43 AM

Previous topic - Next topic

Sagar salvi

अनुभवाचं वय !
अनुभव दयावा कर्जावर
वापर आणि आणून दे,
वापरताना त्याचं गांभीर्य
थोडं मात्र जाणून घे.

अनुभव वापर सांभाळून
वाया नको घालवूस,
अनुभव सुद्धा दमतो थोडा
जास्त नको चालवूस.

वयानुसार अनुभव वाढतो
हे खरं असतय का,
पुस्तकं अनुभव वाटतात
ते वयात बसतय का.

अनुभव म्हणे स्वस्त झालाय
मिळतो आजकाल वजनावर,
खाणं तेवढं महत्वाचं नाहीये
अवलंबून आहे पचण्यावर.

शिक्षण म्हणजे दूध आहे
अनुभव म्हणजे साखर,
शिक्षण घेत देत जा
अनुभव गोडासाठी वापर.

अनुभवाचा माज नको
देऊन टाक लागेल त्याला,
तरुण सुद्धा असतो अनुभव
कुठे लागतंय पांढरं व्हायला.