माणुसकी

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, May 22, 2019, 06:46:08 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.माणुसकी*

माणसाने माणुसकीला
नजरेआड जपलं जरी
दुष्मणाला जात सलते
रक्त एक असलं तरी

राख होते आयुष्याची
सावडण्या गाव येतं
माती मोल होतात नाते
सरण मात्र पेट घेतं

कळून चुकतात माणसं
अन फुले उधळतात खरे
तेव्हांच कळते दुनियादारी
आग लावून बसतात बरे

तेव्हा उध्वस्त होतं सारं
जेव्हा काडी पेट घेते
आपलेच असतात म्हणून
अश्रूंची नकळत सर येते

असो होतं असत दुनियेत हे
येणार येणारचं जाणारा जाणारचं
कलंक लागला असा की
याला पैसा प्रिय होणारचं

हीच खरी माणुसकी
अन हाच खरा देव रे
तुझे तुलाच कळले नाही
मनाला हा कसला चेव रे

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर