निवडणुक

Started by D Ganesh, May 22, 2019, 05:38:56 PM

Previous topic - Next topic

D Ganesh

आले होते नेते, मागच्या ४-५
आठवड्यात कित्येकदा तरी गावात..
पार्टी, झेंडा, चिन्ह,
पांढरा पोशाख अन् किती गोडवा त्यांचा मुखात.

चला आता तरी वेळ
मिळेल त्याच्या कामात..
मतदार, मतदान, विजय,
आश्वासन दिलेत बरेच ते जोमात.

काय करनार मतदार आता
दिले दान, डोळ्यात स्वप्ने घेऊनी..
परत येणार तो कार्यकर्ता, नामदार ?
का वाट बघावी लागेल पाच वर्ष अजूनी.

लोकशाहीत लोक फक्त नावापुरते
राज करतात ते राजकारणी..
राज्यकर्ते ठरलेलेच असतिल तर
का बरं ही निवडणूकीची करणी.