परीक्षा

Started by Sagar salvi, May 22, 2019, 06:59:42 PM

Previous topic - Next topic

Sagar salvi

डोळ्यांची परीक्षा !
प्रत्येक थेंबात आठवणींचा कळस भरतो,
कळस भरला तरी थेंब तसाच उरतो.

प्रत्येक थेंबाला मी नाव दिल तुझं,
ठेवलं काढून बाजूला तुझ्या आठवणीचं ओझं.

एक दिवशी ठरवलं अखा कळस ओतून देईन,
आठवणींचा प्रत्येक थेंब डोळे बंद करून पिईन.

केले मी डोळे बंद आणि थेंब जोरात वाहू लागले,
जणू थेंब माझ्या डोळ्यांची परीक्षाचं पाहू लागले.