हरवलेला

Started by Sagar salvi, May 22, 2019, 07:14:30 PM

Previous topic - Next topic

Sagar salvi

हरवलेला देह !
रस्ता शोधत निघालो होतो, विसरलो वाट,
दिसलें माणसांचे जंगल घनदाट.

पडलो होतो तिथे होता दगडी घाट,
जाग आली आणि झाली पहाट.

उठलो मी तिथून धावत सुटलो पाण्याकडे,
मृगजळाचे लक्ष होते पुढे पुढे जाण्याचे.

अनोळखी चेहऱ्यामधे मी ओळखीचा शोधत होतो,
जणू मी पाण्यामध्ये खड्डा खोदत होतो.

विचारत होतो सगळ्यांना मी माझी ओळख,
गर्दी होती अनोळख्याची डोळ्यासमोर काळोख.

लोकं सगळी शांत होती धुरानी गोंधळ घातलेला,
चेहरे कोणाचे दिसत न्हवते डोळा मात्र फाटलेला.

मी इथे उभा होतो मग आहे कोण फांदयानवर,
मागे वळून बघितलं तर मीच त्यांच्या खांद्यावर.