दचकून

Started by Sagar salvi, May 22, 2019, 10:41:15 PM

Previous topic - Next topic

Sagar salvi

दचकून !

थेंब घसरले डोळ्यातून
आणि आले मुठीत,
घाबरलेल्या या जीवाला
घेना अलगद मिठीत.

ओठ झाले कापरे
शब्द फोडू लागले,
हरवलेल्या कोणाला
डोळे शोधू लागले.

देह झाला घामाघूम
मन सैरा वैरा पळाल,
एकवटलेल्या जीवाला
न सांगून सगळ कळाल.